महाळुंगे पडवळ प्रतिनिधी:
कै. अण्णासाहेब आवटे आणि हुतात्मा बाबू गेनू यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल गाव, म्हणजे “हुतात्मा नगरी “महाळुंगे -पडवळ. होय येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा श्रावण महिन्यातील बैलपोळा साजरा केला जातो. या निमित्त गावातील सर्व शेतकरी बांधव, तसेच मुंबई पुणे इतर ठिकाणी नोकरीस असलेले सर्व गावकरी दरवर्षी येथे एकत्र येतात. सकाळी 11 वाजता “छत्रपती शिवाजी महाराज”, देशभक्त हुतात्मा बाबू गेनू” व “अण्णासाहेब आवटे” यांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पोळ्याला सुरुवात केली जाते.

यावर्षी डॉ. नितीन अण्णासाहेब पडवळ यांचा मानाचा बैल ( सर्किट ग्रुप ) यांनी 41, हजार रुपये लिलाव घेतला आहे. पोलीस पाटलांच्या हस्ते सन्मान पूर्ण बैलास मानाचे बाशिंग बांधन्यात आले संध्याकाळी चार वाजता भव्य अशी बैलांची मिरवणूक काढन्यात आली. रात्री “सुप्रसिद्ध अश्विनी शिवानी बोरगावकर “यांचा लोकनाट्य तमाशा झाला. दुसऱ्या दिवशी भव्य असा कुस्त्यांचा आखाडा होणार असून संध्याकाळी 10 वा. “लावण्य मदन मंजिरी “आर्केस्ट्रा, तसेच तिसऱ्या दिवशी शिळा हगामा होत असतो. रात्री 10 वाजता अस्मिता पुणेकर “चांदणी शुक्राची “आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आली. सलग तीन दिवस आर्केस्ट्रा, तमाशा, कलगीतुऱ्याचा कार्यक्रम, असे नियोजित कार्यक्रम “यात्रा कमिटी” महाळुंगे-पडवळ यांचे वतीने आयोजित करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त येथे अनेक मान्यवर हे येत असतात.

गावचे सरपंच सुजाता चासकर, उपसरपंच अनिल पडवळ, माजी सरपंच दीपक शेठ चासकर, बाबाजी चासकर तसेच गावचे भूषण असणारे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ, राज्य जीएसटी सह आयुक्त संजीव सैद पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय (बापू) चासकर, उद्योजक सुदाम पडवळ हेमंत पडवळ, नवी मुंबई पोलीस अजितकुमार चासकर, किरण वाजगे, शरद बँकचे अधिकारी अभय आवटे, एडवोकेट संतोष चासकर, सतीश चासकर, कैलास चासकर पोलीस भास्कर रघतवान अरविंद सोनवणे, सुदाम अभ्यंकर, गणेश पडवळ, गोपीनाथ जाधव, नितीन मुंगसे, राजेश दहीतुले, नितीन भोर, संदीप वायाळ, शरद फुलसुंदर, विकास सुपेकर, महेश वालझडे, भू संपादन अधिकारी बंडू आवटी, बिल्डर नामदेव पडवळ, मगबुल इनामदार रमेश पडवळ, भानुदास घोडेकर माजी सरपंच तुकाराम आवटे, अक्षय शेठ सोलाट, अमोल सैद, कन्हैया पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.




