नारायणगाव प्रतिनिधी:
भारतीय सणांची विदयार्थ्यांना ओळख व्हावी व माहिती मिळावी यासाठी गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर.केदारी बालकमंदिरमध्ये इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून स्वतः बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीचे गणपती प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेत प्रत्यक्ष बैलजोडी आणून मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाविषयी माहिती देण्यात अली.शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. पारखे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने गणेशमूर्ती बनवल्या होत्या.या प्रदर्शनाचे उदघाट्न शाळेचे चेअरमन मा. अरविंद भाऊ मेहेर सर, श्री सूर्यकांत विधाते सर,शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका मा. सौ. रत्ना डुंबरे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुशांत भुजबळ सर, उपाध्यक्ष सौ.गायत्री वालझाडे मॅडम, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ.पूजा शिंदे मॅडम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
त्यानंतर इयत्ता चौथीतील अद्वैत अष्टेकर या विद्यार्थ्याने अथर्वशीर्षाचे पठण केले. त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र म्हटले.
यानंतर शाळेतील शिक्षिका सौ. मनिषा फुलसुंदर मॅडम यांनी गणेशोत्सव या सणाची माहिती सांगितली. सौ. आशा भुजबळ मॅडम यांनी बैलपोळा सणाविषयी माहिती सांगितली.
श्री.अनिल भालेराव सर, श्री घोलप सर, श्री.खुडे सर यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींचे परीक्षण केले.
यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गणपतीची आरती घेऊन सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मानसी पवार मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.




