नारायणगाव प्रतिनिधी: भारतीय सणांची विदयार्थ्यांना ओळख व्हावी व माहिती मिळावी यासाठी गुरुवार दिनांक 10/9/2026 रोजी ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर.केदारी बालकमंदिरमध्ये इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून स्वतः बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीचे गणपती प्रदर्शन भरविण्यात आले.

प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर इयत्ता चौथीतील अद्वैत अष्टेकर या विद्यार्थ्याने अथर्वशीर्षाचे पठण केले. त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र म्हटले. यानंतर शाळेतील शिक्षिका सौ. मनिषा फुलसुंदर मॅडम यांनी गणेशोत्सव या सणाची माहिती सांगितली. सौ. आशा भुजबळ मॅडम यांनी बैलपोळा सणाविषयी माहिती सांगितली. श्री.अनिल भालेराव सर, श्री घोलप सर, श्री.खुडे सर यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींचे परीक्षण केले.

यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गणपतीची आरती घेऊन सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मानसी पवार मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.




