नारायणगाव प्रतिनिधी : रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या १६ उपक्रमशील शिक्षकांचा ‘रोटरी गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित बेनके व फर्स्ट लेडी धनश्री बेनके यांनी दिली.नारायणगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या वेळी ग्रामोन्नती मंडळाच्या विश्वस्त मोनिका मेहेर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व मार्गदर्शिका राजश्री बेनके, नारायणगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे, रोटरी प्रेसिडेंट इलेक्ट प्रशांत ब्रम्हे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे, द्राक्ष बागायतदार राहुल बनकर, संजय कानडे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमाकांत कवडे, विजय नागरे, सुरेखा बटवाल, राहुल नवले, स्वागता वाजगे, माधुरी बनकर, चैताली आवटे, विवेक बोरसे, छाया गायकवाड, शुभांगी वाबळे, अमिन पठाण, रंजना पिल्ले, मंगल फुलसुंदर, सीमा सोनवणे, रिना शेनॉय आणि प्रिया दरेकर या १६ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मोनिका मेहेर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित बेनके तसेच पुरस्कारार्थी शिक्षक रमाकांत कवडे व राहुल नवले यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन हेमंत महाजन, मंगेश मेहेर, योगेश भिडे, तेजस वाजगे, निर्मला मेहेर, सीमा महाजन, सचिन घोडेकर, लहू गायकवाड, विवेक नाईक, भरत चिलप, वैभव बेनके, डॉ. केतकी काचळे, अमृता भिडे, रेखा ब्रम्हे, प्रियांका बोरकर, अश्विनी वाजगे, रिनाली वामन, माधवी चिलप व मनाली नाईक यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष हेमंत महाजन यांनी केले, तर आभार मंगेश मेहेर यांनी मानले.



