नारायणगाव प्रतिनिधी:
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(CBSE) वतीने ‘कौशल बोध’ इयत्ता ६ वी ते ८ वी क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून कौशल्य शिक्षणाच्या अनिवार्य अंमलबजावणी संदर्भात क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले असून या कार्यशाळेत पुणे, जुन्नर, आंबेगाव,खेड, चाकण व नगर येथील एकूण ११४ शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

“कौशल बोध” हा विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, संवाद कौशल्य,पर्यावरण संवर्धन जागरूकता कौशल्य इत्यादी कौशल्य विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव यांची सांगड घालणे हा आहे. विविध कृती, प्रकल्प आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, सांघिक भावना आणि स्वावलंबन यांसारख्या महत्त्वपूर्ण जीवनकौशल्यांचा विकास करण्यावर भर दिला जातो.

दोन्ही मार्गदर्शकांनी अत्यंत प्रभावी, संवादात्मक आणि कृतीशील पद्धतीने शिक्षकांना मार्गदर्शन केले. ‘कौशल बोध’ उपक्रमाची वर्गातील प्रभावी अंमलबजावणी, कृतीआधारित व प्रकल्पाधारित अध्यापनाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक विकसित करण्याच्या विविध पद्धती यांविषयी सविस्तर माहिती दिली. विविध उपक्रम आणि प्रात्यक्षिकांमुळे कार्यशाळा अधिक रंजक व ज्ञानवर्धक ठरली. या यशस्वी आयोजनासाठी CBSE कौशल्य विभागाचे सहसंचालक (दिल्ली) सतीश पहल सर आणि वरिष्ठ विभाग अधिकारी आदरणीय डायरेक्ट ऑफ ट्रेनिंग मृदुलासिंग, रिजनल ऑफिसर बालानी सर, पल्लवी माळी मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच व्हेन्यू डायरेक्टर, उप-DTC आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन प्रा. दीप्ती भंडारी व प्रा. रवीना उदावंत यांनी केले.
डॉ.हितेश शर्मा रिसोर्स पर्सन म्हणून म्हणाले “कौशल बोधचा उद्देश फक्त कौशल्य शिकवणे नाही, तर Better Humans घडवणे आहे. कोणताही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो, प्रत्येक व्यवसायाला स्वतःची प्रतिष्ठा आहे, हे मुलांना शिकवणे हीच खरी गरज आहे. त्यांनी वरिष्ठ विभाग अधिकारी यांचे विशेष उल्लेखनीय आभार मानले.
वृंदा मुलतानी मॅडम* यांनी पंचपदी व पंचकोशाच्या आधारे कृती-आधारित अध्यापनाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. व “ब्लुमिंगडेलने कौशल मेळा ते आदरातिथ्यापर्यंत केलेली उत्कृष्ट व्यवस्था, स्वागतशील वातावरण आणि शिस्तबद्ध समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरला,” असे वृंदा मॅडम म्हणाल्या.
शाळेचे अध्यक्ष मा. माजी आमदार श्री. अतुल बेनके म्हणाले, “दोन्ही मार्गदर्शकांनी अत्यंत प्रभावी, संवादात्मक आणि कृतीशील पद्धतीने मार्गदर्शन केले. विविध उपक्रम आणि प्रात्यक्षिकांमुळे कार्यशाळा अधिक रंजक व ज्ञानवर्धक ठरली.”
शाळेच्या खजिनदार डॉ. गौरीताई बेनके म्हणाल्या, “पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन शिकवणारे, हाताला कौशल्य आणि मनाला आत्मविश्वास देणारे, मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे व आत्मनिर्भर बनवणारे हेच शिक्षकाचे कर्म आणि हीच खरी शिक्षकांच्या सन्मानाची जीवनकौशल्ये आहेत.”
शाळेने कार्यक्रमासाठी केलेली उत्कृष्ट व्यवस्था, कौशल मेळा ते आदरातिथ्या पर्यंत सांघिक कार्य, वचनबद्धता आणि बारकाव्यांकडे लक्ष देणे अत्यंत प्रशंसनीय होते.



