नारायणगाव प्रतिनिधी : उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आंबेगाव येथील पुढारीचे पत्रकार संतोष वळसे पाटील तर उपाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे जुन्नरचे पत्रकार सचिन कांकरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारणी आज जाहीर केली.

पुणे जिल्ह्याचा वार्ता विस्तार आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून पुणे जिल्ह्याचे विभाजन करीत उत्तर आणि दक्षिण पुणे जिल्हा पत्रकार संघ निर्माण करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी पत्र परिषदेने घेतला आहे. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांना स्वतंत्र कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहेत. पुणे महानगर आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे स्वतंत्र अस्तित्व राहणार असून हे दोन्ही संघ थेट परिषदेला जोडलेले असतील. उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघात जुन्नरआंबेगाव,मावळ,खेड, शिरूर आणि हवेली या सहा तालुक्यांचा समावेश आहे. संयुक्त जिल्हा संघाची बैठक नुकतीच मुळशी येथे संपन्न झाली. या काळात दोन्ही संघांनी सदस्य नोंदणी करून मतदार यादी अद्यावत करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.

नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे
सचिन कांकरिया उपाध्यक्ष जुन्नर
दत्ता भालेराव सरचिटणीस खेड
हनुमंत देवकर उपाध्यक्ष चाकण
संजय बाराहाते शिरूर
रवी पाटील जिल्हा निवडणूक प्रमुख
संजय पाटील जिल्हा कायदेशीर सल्लागार
मावळ येथील ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांना थेट परिषदेवर घेण्यात आले असून त्यांची परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त शरद पाबळी उपाध्यक्ष गणेश मोकाशी सुनील लोणकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यकारणीतील अन्य पदे तसेच डिजिटल मीडिया परिषद पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महिला आघाडीच्या नियुक्ती देखील लवकरच जाहीर करण्यात येतील असे शिवराज काटकर यांनी जाहीर केले आहे.



