नारायणगाव प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून शुक्रवार दि. २४/७/२०२६ रोजी ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिरच्या प्रांगणात आषाढी एकादशी निमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी असा जयघोष करत, विठूरायाच्या भक्तिरसात तल्लीन होत शाळेतील सर्व बालवारकरी दिंडीत सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले. इयत्ता पहिलीचे छोटे छोटे विद्यार्थी विविध संतांच्या व विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत आले होते. दिंडीतील विविध संतांच्या व विठोबा-रखुमाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष पंढरपूरचे दर्शन उपस्थितांना घडले. विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यांवर सुंदर नृत्य, भक्तीगीते व अभंग सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. पारखे मॅडम यांनी केले. शाळेचे चेअरमन माननीय श्री.अरविंद भाऊ मेहेर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना वारीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य माननीय श्री. विठ्ठलराव औटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व मा. पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाच्या विश्वस्त मा. सौ. मोनिकाताई मेहेर मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालकमंदिर शाळेचे चेअरमन मा. श्री. अरविंद भाऊ मेहेर सर, बालकमंदिर समितीचे सदस्य मा. श्री. निलेश पाटे सर, मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. रत्ना डुंबरे मॅडम, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. सौ. पूजा शिंदे , शाळा व्यवस्थापन समितीच्या उपअध्यक्षा मा. सौ. गायत्री वालझाडे , स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव येथील सर्व मा. सदस्य तसेच मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या दिंडी सोहळ्यात इयत्ता तिसरीची कु. सान्वी घोडेकर हिने वारीचे महत्त्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिकाचा महिमा सांगणाऱ्या विठ्ठलाच्या गाण्यांवर व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे भक्त, संत यावर आधारित गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.
इयत्ता पहिलीतील प्रणय निलेश नेवकर याने ” कानडा राजा पंढरीचा” हा सुंदर अभंग सादर केला .विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक श्री.राहुल दुधवडे सर यांच्या समवेत चंद्रभागेच्या तिरी…. हे सुंदर विठ्ठल गीत सादर करून वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर वारीचा आत्मा असणारे रिंगण व अभंग घेण्यात आले. त्यानंतर आरती करून उपस्थित त्यानंतर आरती करून उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सपना घोडेकर मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.
अशाप्रकारे हर्षोल्हासमय वातावरणात पसायदानाने शाळेतील दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.



