वडगाव (कांदळी)प्रतिनिधी :
राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श निर्मल ग्राम वडगाव (कांदळी) येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश दिला. नूर-ए-मुस्तफा यंग कमिटी, मुस्लिम जमात आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्वास फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हजारो महिला व पुरुषांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन गुन्हे अन्वेषण विभागाचे एपीआय महादेव शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबाला किराणा साहित्याची मदत देण्यात आली. तसेच निवृत्त डीवायएसपी चंद्रकांत लांडगे आणि एपीआय महादेव शेलार यांचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वडगाव-कांदळीतील हिंदू-मुस्लिम सामाजिक एकोप्याचे कौतुक करत पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचेही विशेष कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. कल्पना काळे, जिल्हा परिषद सदस्य श्री. मंगेशअण्णा काकडे, पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, पंचायत समिती सदस्या माधुरी निलख,मा.मुबंई पोलीस सह.आयुक्त प्रकाश लांडगे, मा.डीवायएसपी अरुण भोर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रवीण सपांगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम, सुरज वाजगे, शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख योगेश उर्फ बाबू पाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली खंडागळे,सरपंच सौ.उल्काताई श्रीकांत पाचपुते ,माजी सरपंच रामदासशेठ पवार,साईलक्ष्मी पतसंस्था चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते सर,विघ्नहर कारखाना संचालक विकास चव्हाण, संजय खेडकर,मनोहर पटाडे सर, उद्योजक बाजीराव मुटके,शोभा पाचपुते तसेच गावातील सर्व संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. वरील सर्व मान्यवर व्यक्तींचा सन्मान मुस्लिम समाज अध्यक्ष शहाबुद्दीन इनामदार, उपाध्यक्ष रफिक इनामदार, खजिनदार नसीर इनामदार, उस्मान पठाण यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूर-ए-मुस्तफा यंग कमिटीचे पदाधिकारी तसेच गावातील हिंदू-मुस्लिम युवकांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक सागर दहितुले यांनी केले, तर सूत्रसंचालन अशपाक इनामदार यांनी केले. आभार इरफान पठाण यांनी मानले.




