नारायणगाव प्रतिनिधी
-लायन्स क्लब ऑफ नारायणगाव पुरस्कृत आणि डॉ. गिरीश ढमाले स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित पहिल्या स्व.डॉ. गिरीश ढमाले स्मृती मॅरेथॉन २०२६ मोठ्या उत्साहात नारायणगाव येथे संपन्न झाली. स्व.गिरीश ढमाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यात स्पर्धेत एकूण ५ गटात लहान मुले, मुलींपासुन ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण ५२७ खेळाडूंनी सहभाग घेतला. पुणे, नाशिक, सांगली, बारामती, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यात एकूण सहा गटात प्रत्येक गटात १० क्रमांक काढून प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षीसे देण्यात आली.

यानिमित्ताने आरती गिरीश ढमाले, शिवसेना तालुकाप्रमुख व उपसरपंच योगेश उर्फ बाबु पाटे, उद्योजक अशोक गांधी, युवा नेते सुरज वाजगे, भागेश्वर डेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वाती काठे/धोंगडे, गोपनीय विभागाचे दत्ता ढेंबरे, शिरीष ढमाले, लायन्स क्लब नारायणगावचे प्रोजेक्ट इन्चार्ज मनोज भळगट, राजेंद्र देसाई, अध्यक्ष वैभव मुथ्था, सचिव गिरीश मुनोत, खजिनदार हिमांशू शहा, योगेश रायकर, ला. आनंद कोठारी, डॉ.अनुष्का शिंदे, प्रा.लहू गायकवाड, प्रा.श्रीकांत फुलसुंदर, प्रा.शरद काफले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेसाठी असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करत खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. गिरीश ढमाले स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम वारुळे, उपाध्यक्ष सचिन जुंदरे, सचिव अशफाक पटेल, सहसचिव रवी शिंदे, खजिनदार सुशांत बनकर, सहखजिनदार दादासाहेब कोठाळे, संचालक प्रशांत इचके, राजु कोऱ्हाळे, प्रा. दिलीप शिवणे यासह विक्रांत खरगे, जुबेर शेख, क्रीडा शिक्षक प्रा.उमेश पनेरू, डॉ.सुनील पानसरे सर, बबन गुळवे, एच.पी नरसुडे, भालेराव सर, सचिन काशिद, अमित झरेकर, ओंकार मेहेर, यांसह कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगावचे प्राध्यापक, छात्रसेना विद्यार्थी, नारायणगाव पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत नारायणगाव व वारूळवाडी, ढमाले सर कुटुंबीय, मित्रपरिवार व विद्यार्थी, क्रीडा शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन अभय वारुळे, परशुराम वारुळे यांनी केले, प्रास्ताविक प्रशांत इचके, तर आभार अशफाक पटेल यांनी मानले.



