नारायणगांव प्रतिनिधी
नारायणगांव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री किशोर खैरे,उपाध्यक्षपदी सागर दंरदाळे तर सचिव पदी ॲड.राजेंद्र कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी मुक्ताई मंगल समाज कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष योगेश उर्फ बाबू पाटे यांनी याविषयीचा प्रस्ताव मांडला व त्याला उपस्थित ग्रामस्थ,सरपंच शुभदा वाव्हळ, कार्यकारी सोसायटी अध्यक्ष संतोष नाना खैरे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, विक्रांत पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे,माजी उपसरपंच आशिष माळवदकर, मा.सरपंच अशोक खैरे,रामदास बाळसराफ, विकास नाना तोडकरी,रामदास अभंग,अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, मा.जि प सदस्या राजश्रीताई बोरकर,वैजयंती को्ऱ्हाळे,सोनाली पाटे, पुष्पाताई खैरे,कनिका खैरे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.




