नारायणगाव प्रतिनिधी :
शनिवार दिनांक २२/८/२०२६ रोजी सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा,नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा व इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परिक्षेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला . शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. पारखे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त मा.सौ.मोनिकाताई मेहेर मॅडम तसेच ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सुजितभाऊ खैरे , ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न कृषिभूषण मा.श्री.अनिलतात्या मेहेर सर ,ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री शशिकांतभाऊ वाजगे सर , ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालकमंदिर शाळेचे चेअरमन मा. श्री अरविंद भाऊ मेहेर सर, बालक मंदिर समितीचे सदस्य मा.श्री. निलेश पाटे,शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ.सुनिता पारखे मॅडम, उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम,शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. रत्ना डुंबरे मॅडम,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. सौ.पूजा शिंदे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुशांत भुजबळ सर, माता पालक संघाच्या अध्यक्ष मा. सौ.गायत्री वालझाडे मॅडम,यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक इ.मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परिक्षेत इयत्ता पहिली ते चौथीचे एकूण २०२ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ४५विद्यार्थी राज्य,जिल्हा व केंद्र गुणवत्ता यादीत झळकले. आनंदाची बाब म्हणजे इयत्ता पहिलीचा कु. वरद अमित झरेकर याने १५० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेला इ.पहिली ते चौथीचे एकूण २४५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ४५विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले.या परीक्षेत इयत्ता पहिलीतील कु.सई समीर वारुळे या विद्यार्थिनीने २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच इ दुसरी मधील जय सचिन भोसले या विद्यार्थ्याने २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला तसेच इयत्ता चौथी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ५५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ४५ विद्यार्थी पात्र झाले. वेदांत गुणवंत जाधव ८५% गुण व सर्वज्ञ राजेंद्र बेलवटे ८२% गुण मिळवून दोन्ही विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले. या सर्व विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश संपादन करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
सर्व प्रथम शाळेचे चेअरमन मा. अरविंद भाऊ मेहेर सर यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्री.श्रीकांत नागटिळक सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षिका व पालकांचे ग्रामोन्नती मंडळाचे सर्व मा.पदाधिकारी, बालकमंदिर शाळेचे चेअरमन मा. अरविंद भाऊ मेहेर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ पारखे मॅडम, उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे मॅडम यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सौ. योगिता अजाब मॅडम यांनी मानले.
शेवटी पसायदान घेऊन अतिशय आनंदाच्या वातावरणात बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला.



