नारायणगाव प्रतिनिधी:
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने नारायणगाव येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत फटाके फोडून तसेच मेलोडी चॉकलेटचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, सोनम वांगचूक यांच्या २६ दिवसांच्या उपोषणाला, CJP च्या सुमारे ४५ दिवस चाललेल्या आंदोलनाला आणि देशभरातून वाढलेल्या जनसमर्थनामुळे सरकारला अखेर हा निर्णय घ्यावा लागला, अशी त्यांची भावना आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. भविष्यात विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक प्रश्नांवर राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य सातत्याने जनजागृती व लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत एकजुटीचा संदेश दिला.
यावेळी राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख, उपाध्यक्ष प्रसाद हिंगे, कार्याध्यक्ष गौतम औटी, सचिव विजय घेगडे, ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार, नागेश्वारी केदार, आराध्या वाव्हळ, वैभव भूमकर, जफर शेख, सकलेन आतार, अमन इनामदार, गिरीराज वाव्हळ, मनोज वर्मा, योगेश लोखंडे, पंकज भालेराव, मयूर भोईटे, मुन्ना पठाण आदी कार्यकर्ते, विद्यार्थी, व ग्रामस्थ उपस्थित होते.



